#कापूस (Cotton)
मुख्य किळी :मावा, तुळतूळे, फुलकिडे, गुलाबी बोंडंअळी इ.
#मावा, तुळतुडे, फुलकिडे
#व्यवस्थापन :- मावा, तुळतुडे, फुलकिडे.
■ आंतरमशागत करून पीक तणमुक्त ठेवावे.
■ शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी.
■ मावा, तुडतुडे, फुलकिडे : बुप्रोफेझिन २०% एससी २० मिली किंवा फ्लोनिकॅमीड ५० डब्ल्युजी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
■ गुलाबी बोंडंअळी.
#व्यवस्थापन :-गुलाबी बोंडअळी.
■ पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
■ कामगंध सापळे लागवडीच्या ४५ दिवसानंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ सापळे याप्रमाणे लावावेत. सामूहिकरीत्या पतंग गोळा करण्यासाठी
हेक्टरी २० सापळे लावावेत.
- आर्थिक नुकसानीची संकेत पातळी :- ८ पतंग / सापळा / दिवस सलग तीन दिवस किंवा १ अळी / १० फुले किंवा १ अळी / १० बोंडे ओलांडल्यास शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
#जैविक कीटकनाशकाचा वापर :-
■ ५% निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
■ बिव्हेरिया बॅसियाना १.५ % विद्राव्य घटक असलेली भुकटी ४०ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
■ ट्रायकोकार्ड :- ट्रायकोग्रामाटॉयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधीलमाशीने परोपजीवीग्रस्त १.५ लाख अंडी प्रति हेक्टर याप्रमाणात पीक ५० ६० दिवसाचे झाल्यानंतर दोन वेळा वापरावे.
#विशेष सूचना :-
* वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
* लागोपाठ एकाच किटकनाशकाची फवारणी करु नये.
* पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाची (लॅमडा साहॅलोथ्रीन, फेनवलरेट, सायपरमेथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअगोदर करु नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होतो.
* एकापेक्षा जास्त कीटकनाशक फवारणी पंपात मिसळून वापरू नये.
* गुलाबी बोंडअळीसोबत रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तरच शिफारस केलेली मिश्र कीटकनाशके वापरावी.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें