पिकाचा कालावधी - 0-40 दिवसांचा असते वेळी :-
संभाव्य प्रमुख किडी :- मावा,तुडतुडे,पिठ्या ढेकूण
घ्यावयाची काळजी :-
संभाव्य प्रमुख किडी :-
घ्यावयाची काळजी :-
- सुरवातीच्या काळात इमिडाक्लोप्रीडचा वापर टाळावा.
- पहिली फवारणी जेवढी लांबवता येईल, तेवढी लांबवावी, त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल.
- रस शोषण करणाऱ्या किडींसाठी ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. किंवा
- फोरेट (10 जी) किंवा फिप्रोनील (0.3 जी दाणेदार) 10 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे जमिनीत ओल असताना झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने द्यावे. किंवा
- पाच टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी यांचा वापर पीक 30 दिवसांचे झाल्यानंतरच करावे. किंवा
- खोडाच्या वरच्या बाजूस ऍसिफेट (75 टक्के) किंवा मोनोक्रोटोफॉस (36 टक्के) यांचे पाण्यातील द्रावण (1ः4 प्रमाण) लावावे.
- मित्र कीटकांना हानिकारक कीटकनाशकांची फवारणी टाळावी.
पिकाचा कालावधी - 40-60 दिवसांचे असता वेळी :-
संभाव्य प्रमुख किडी :-
तुडतुडे, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा).
घ्यावयाची काळजी :-
- व्हर्टिसिलीयम लिकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
- थायामेथोक्झाम (25 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा ऍसिटामिप्रीड (20 टक्के) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)च्या व्यवस्थापनासाठी नोमूरिया रिलाई हा बुरशीजन्य घटक 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावा. अंडीपुंज व लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
- सुरवातीच्या काळात दुय्यम किडी जसे करडे भुंगेरे, पाने पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळ्या, केसाळ अळ्या इत्यादी कमी प्रमाणात आढळून येतात, त्यांच्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करू नये.
पिकाचा कालावधी - 60-80 दिवसांचा असते वेळी :-
संभाव्य प्रमुख किडी :-
फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी
घ्यावयाची काळजी :-
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें