सोयाबीन पिकावरील खोडमाशी ची लक्षणे व किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
1) प्रौढ माशी घरमाशीसारखी असते.
2) ही आकाराने फक्त 2 मी मी. व चमकदार काळ्या
रंगाची असते.
3) प्रौढ मादीमाशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते.
4) पूर्ण विकसित अवस्थेत ही आळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणत: 3 ते 4 मी.मी. लांबीची असते.
5) मादी नरापेक्षा किंचीत मोठी असते.
6) मादी माशी मुख्यत: वरच्या बाजूच्या पानामध्ये अंडी घालते.
◆ प्रादुर्भावाची लक्षणे:
1) पानाच्या शिरांद्वारे ही आळी खोडांमध्ये प्रवेश करून खोडाचा गाभा पोखरून खाते.
2) उगवणीपासून 7 ते 10 दिवसांपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो..
3) प्रादुर्भाव ग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात व मरून जातात.
4) झाड पोखरल्यामुळे अन्नर्द्व्याचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानावर लालसर काळे ठपके दिसू लागतात.
5) तसेच पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो.
6) झाडे वळून मरून जातात.
7) पिकांच्या नंतरच्या अवस्थेमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत परंतू, खोड पोखरल्या मुळे शेंगांची संख्या व सोयाबीनच्या बियांचे वजन कमी होते तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत.
◆ किडीचे एकात्मिक व्यवस्थापन -
1) पेरणीपूर्व बियाण्यास प्रथम बीजप्रक्रिया करावी.
2) मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठीकाणी 10% दाणेदार फोरेट हेक्टरी 10 कलो याप्रमाणात पेरणीपूर्व द्यावे.
3) खालीलप्रमाणे एका रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी -
A) इथीऑन 50 ईसी हे 30 मिली किंवा
B) क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5 एससी हे 3 मिली. किंवा
C) इंडोक्झाकर्ब 18.8 ईसी हे 6.66 मिली. किंवा
D) लँबडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस हे 6 मिली. किंवा
E) थायोमिथोक्झाम 12.60 % + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50 % झेडीसी हे 2.5 मिली
F) ट्रायझोफॉसट 40 ईसी हे 10 मि.लि
वरीलपैकी कोणतेही एक रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🙏🙏
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें