# कशामुळे होतो :-
अल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात, जी इतर कोणतेही जिवंत यजमान उपलब्ध नसल्यास कपाशीच्या अवशेषात जगते. जंतुंचा प्रसार वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या बीजाणुंद्वारे आणि उडणाऱ्या पाण्यामुळे निरोगी झाडावर होतो. ओले वातावरण आणि २७ अंश तापमानात संक्रमण जोर पकडते. रोपावस्थेत आणि हंगामात उशीरा पाने गळण्याचा काळ या रोगास जास्त संवेदनशील असतो. संक्रमणाची जोखीम कपाशीच्या पानांवर खालपासुन वरपर्यंत कमी होत जाते. बुरशीला अनुकूल परिस्थितीत खासकरुन जर फळ फांद्या बुरशीने संक्रमित झाल्या तर कपाशीच्या संवेदनशील वाणांच्या पानांची मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. झाडांना जास्त फळधारणा किंवा अकाली पानगळ झाल्याने येणाऱ्या भौतिक किंवा पोषणांच्या ताणाने या रोगाच्या लक्षणांचा विकास जास्त होतो.
# कशा पद्धतीची लक्षणे दिसतात :-
१) पानावर जांभळ्या कडांसकट तपकिरी ते राखाडी ठिपके येतात.
२) ठिपके हळुहळु वाळतात.
३) केंद्र बहुधा गळतात.
४) फांद्यांवर छोटे दबलेले डाग येतात.
५) कळ्या गळतात.
लवकर संक्रमण झाले असता पान आणि पर्णकोषांवर बारीक, गोलाकार, तपकिरी ते गव्हाळ रंगाचे, जांभळी कडा असलेले ठिपके उमटतात जे १-१० मि.मी व्यासाचे असतात. या ठिपक्यांची अनेकदा केंद्रीत वर्तुळाकार वाढ झालेली दिसते जे वरच्या पृष्ठभागावर एखाद्या भागातअधिक स्पष्टपणे होते. जसे डाग वाढतात, त्यांची केंद्रे हळुहळु वाळतात आणि राखाडीसर होतात, क्वचित भेगाही पडतात आणि (बंदुकीने गोळी मारल्यासारखे दिसते) गळतात. हे डाग मोठे होऊन एकमेकात मिसळतात आणि पानाच्या पात्याच्या मध्यभागी अनियमित आकाराचे वाळलेले भाग तयार होतात. आर्द्र हवामानात बुरशी मोठ्या प्रमाणात बीजाणू तयार करते आणि सोडते, ज्यामुळे हे ठिपके काजळी काळे दिसतात. फांद्यावर व्रणांची सुरवात बारीक खोलगट ठिपक्यांनी होते जे नंतर कँकर्समध्ये (व्रणांमध्ये) विकसित होतात, भागांना भेगा आणि तडे जातात. गंभीर संक्रमण झाले असता फुलांच्या कळ्या गळतात, ज्यामुळे बोंड विकसित होत नाही.
# काही चित्रणे :-
# शिफारशी :-
रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात किंवा जेव्हा काढणी जवळ असते तेव्हा खालील सेंद्रीय नियंत्रण पद्धतींची आम्ही शिफारस करतो. रोगाच्या अधिक प्रगत अवस्थेत, कृपया रसायनिक नियंत्रण उपायांचा वापर करा.
मिश्रण करुन किंवा विविध उत्पाद एकाच वेळी
वापरण्याची शिफारस केली जात नाही.
# जैविक नियंत्रण :-
सुडोमोनस फ्ल्युरोसेन्सची (१० ग्रॅम प्रति किलो बियाणे) बीज प्रक्रिया पिकांना थोडेफार संरक्षण देते आणि ०.२% प्रत्येक १० दिवसांनी फवारणी केल्यास संक्रमण खूप कमी होते.
# रासायनिक नियंत्रण :-
१) Tebuconazole (टेब्युकोनाझोल) 50.0WG, Trifloxystrobin (ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन ) 25.0 WG असणारे ब्रँड...
• Ovitan (Godrej).
• Nativo (Bayer).
• Tebuconazole 50.0% WG, Trifloxystrobin 25.0% WG (Bayer).
२) Pyraclostrobin (पायराक्लोस्ट्रोबिन) 20.0 WG असणारे ब्रँड...
• Headline (BASF) .
३) Propiconazole (प्रॉपिकोनाझोल) 25.0 EC असणारे ब्रँड
• Shine (Safex)
• Session (MAC) .
• Phylum (Willowood)
उत्पाद खरेदी करताना, वरील सक्रिय घटक,
उत्पादावरील लेबलावर लिहिलेले असण्याची खात्री करा. त्यानंतरच खरेदी करा.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें