निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचे रोगांपसून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. या बुरशीचे कार्य, वैशिष्ट्ये आणि रोग नियंत्रणातील महत्त्व याविषयी जाणून घेऊ.
ट्रायकोडर्माची कार्यपद्धती :-
- ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून, त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते.
- ही बुरशी ग्लायटॉक्झिन व व्हीरिडीन नावाचे प्रतीजैविक निर्माण करते. ते रोगकारक बुरशीना मारक ठरते.
- ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरते.
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धती :-
- ट्रायकोडर्मा ही विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकांवर फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरिता उपयोग होतो.
- बीजप्रक्रिया :- ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे. बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावे. बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
- ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशींनाशकांसोबत करू नये.
- ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.
ट्रायकोडर्माचे फायदे
- ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवणशक्ती वाढण्यास मदत होते.
- रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
- ट्रायकोडर्मा ही बुरशी नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. रासायनिक बुरशीनाशकांप्रमाणे माती, पाणी, व पक्षी यांच्या आरोग्यास धोका पोचत नाही. ही बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थावर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशींनाशकापेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो. पिकांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते.
ट्रायकोडर्मा वापरण्याची पद्धत :-
१) वापराची पद्धत :- बिजप्रक्रिया.
पिके :- सर्व पिकांना चालेल.
रोग :- मर, मूळकुज, खोडकुज, आणि रोपांचा नाश इत्यादी.
प्रमाण :- पेरणीपुर्वि ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति एक किलो बियाण्यास हाताने चोळावी. त्यानंतर सावली मध्ये सुकवून लगेच पेरणी करावी.
२) वापराची पद्धत :- माती प्रक्रिया.
पिके :- सर्व पिकांसाठी उपयुक्त.
रोग :- मर, मूळकुज, खोडकुज, रोपांचा नाश इत्यादी.
प्रमाण :- १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा पावडर २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखणात मिसळून एक एकर क्षेत्रातील मातीत मिसळावी व लगेच पाणी द्यावे.
३) वापराची पद्धत :- द्रावणाद्वारे झाडाच्या बुंध्यापाशी.
पिके :- डाळिंब व इतर फळझाडे.
रोग :- मर, मूळकुज इत्यादी
प्रमाण :- १० ते १५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर अधिक १ लिटर पाणी यांचे द्रावण करून झाडाच्या बुंध्यापाशी टाकावे व मातीने झाकून घ्यावे.
ट्रायकोडर्माचा चे मायक्रोस्कोप णे घेतलेली काही चित्र :-
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें