सीधे मुख्य सामग्री पर जाएं

जैविक / सेंद्रिय खत म्हणजे काय? कश्या पद्धतीने वापर करावा? सेंद्रिय खताचे फायदे तसेच वापर करताना घ्यावयाची काळजी.... 🐞🌾🌱

सुरक्षित व  सकस अन्नासाठी  जगभरात सेंद्रिय  शेतीचा अवलंब केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची  गरज पाहता उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराने शेती व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. रासायनिक खते ही महाग आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. रासायनिक खते देशाबाहेरुन आयात केल्याने मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी वापरावी लागते. तसेच शासनास त्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन रासायनिक खतांच्या किमती शेतक-यांना परवडणा-या स्तरावर आणाव्या लागतात. रासायनिक खतांच्या वापराने सेंद्रिय व जैविक खतांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण घटले आहे. जमिनीत टाकलेली अन्नद्रव्ये व पिकांनी जमिनीतून घेतलेली अन्नद्रव्ये यामध्ये मोठी तफावत आहे.

परिणामत: रासायनिक खते वापरूनही उत्पादनात घट दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. शाश्वत किफायतशीर शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. शेतीतील उत्पादन खर्चाचा प्रमुख भाग बियाणे, खते व कीटकनाशके हा आहे. यावरील खर्च कमी केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. वापर करणे व शाश्वत किफायतशीर शेतीचे ध्येय साध्य करण्यासाठी कृषि विभागाने जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये द्रवरुप जैविक खते उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कृषि विभागाच्या दहा धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे आहेत.

जैविक खते :-

पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणा-या, मिश्रणास जैविक खत असे म्हणतात. जैविक खते ही जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणा-या जिवाणूंपासून तयार केली जातात. म्हणून जैविक खताचे जमीन व पिकावर कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. जैविक खते हा शाश्वत शेतीचा मूलभूत घटक आहे.

जैविक खतांचे प्रकार :-

१) नत्र स्थिर करणारी जैविक खते

अ) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते

रायझोबियम :- रायझोबियम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतो. या गाठींमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. सर्वसाधारणपणे रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी ५० ते १५० किलो नत्र स्थिर करतात. रायझोबियम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १९ ते ६२ टक्के वाढ आढळून आली आहे. रायझोबियम जिवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जिवाणू दुस-या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जिवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग इ. द्विदल पिकांसाठी वापरले जाते. त्याचा तपशील पुढील तक्त्यात दिला आहे.

ब)असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते :-

१)अझेटोबॅक्टर, २)अझोस्पीरीलम, ३)असिटोबॅक्टर

अझेटोबॅक्टर :- अझेटोबॅक्टर जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरुपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझेटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते. अझेटोबॅक्टर जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या विकरणातून तयार होणा-या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जिवाणूच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे लागते. सर्वसाधारणपणे अझेटोबॅक्टर जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो १४ ते ३३ टक्के वाढ आढळून आली आहे.

अझोस्पीरीलम :- अझोस्पीरीलम जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझोस्पीरीलम जिवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे अझोस्पीरीलम जिवाणू प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र स्थिर करतात. अझोस्पीरीलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ आढळून आली आहे.

असिटोबॅक्टर :- हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत. असिटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये व पिकामध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये असिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३० ते ३०० किलो नत्र स्थिर करतात. असिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २० टक्के वाढ आढळून आली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा, इ. मध्ये वापरासाठी असिटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.

२) स्फुरद विरघळविणारी जैविक खते :-

स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के स्फुरदपिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम बॅसिलस मेगाटेरीएम सारखे स्फुरद विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात. स्फुरद विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

३) पालाश उपलब्ध करणारी जैविक खते :- 

पालाश हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे. परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध

करण्याचे काम बॅसिलस म्युसिलाजिनस सारखे पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १o ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

४) झिंक विरघळविणारी जैविक खते :- 

झिंक हे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळविण्याचे काम बॅसिलस स्ट्रिआटा सारखे झिंक विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते. झिंक विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

५) मायकोरायझा :- 

मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

६) जिवाणू संघ :- 

अ) घनरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)

ब) द्रवरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू संघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळवणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा समावेश असतो. या जिवाणूंचे निर्जतुक वाहकामध्ये मिश्रण करून जिवाणू संघ तयार केला जातो. जिवाणू संघ हा पीकनिहाय तयार करता येतो व त्यामुळे शेतक-यांना वापरण्यासाठी जैविक संघ अतिशय उपयुक्त आहे.

• जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती व मात्रा :-

१) बीजप्रक्रिया :-

जैविक खते प्रामुख्याने बीजप्रक्रियेद्वारे वापरली जातात. ही सोपी व फायदेशीर पद्धत आहे. प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये १० किलो बियाणे घेऊन त्यावर १०० मि.लि. जैविक खत टाकावे व हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे. बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर बियाणे काढून थोडा वेळ सावलीत सुकवावे. याप्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त जैविक खताची बीजप्रक्रिया करता येते. सोयाबीन व भुईमूग या पिकांचा पृष्ठभाग नाजूक असल्याने या पिकांच्या १o किलो बियाण्यासाठी ५० मि.लेि. जैविक खत वापरावे.

२) इतर पद्धती :-

अ) रोपांची मुळे बुडविणे ज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते, त्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. एक लिटर जैविक खत १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास कालावधीसाठी या द्रावणात बुडवून ठेवावीत व त्यानंतर लागवड करावी.

ब) माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळणे माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून जैविक खत दिले जाऊ शकते. ४०० ते ६०० किलो ओलसर मातीत किंवा शेणखतात किंवा गांडूळ खतात १ लिटर जैविक खत मिसळून रात्रभर ठेवावे. पेरणीपूर्वी किंवा जमिनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.

क) पिकांच्या  मुळांभोवती देणे उभ्या पिकास जैविक खत स्प्रे पंपाच्या सहाय्याने देता येते. २०० लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण सकाळी किंवा सायंकाळी पिकांच्या मुळांजवळ नोझल काढलेल्या पंपाच्या सहाय्याने फवारावे.

ड) ठिबक सिंचनाद्वारे देणे ठिबक सिंचनाद्वारे जैविक खत पिकांना देता येते. एक एकर क्षेत्रासाठी १ लिटर जैविक खत ठिबक सिंचनाच्या यंत्रणेतून द्यावे. फळपिके, ऊस, कापूस इ. पिकांना ही पद्धत उपयुक्त आहे.

ई) बेणे प्रक्रिया ऊस, बटाटा, हळद, अद्रक, इत्यादि पिकांच्या बेण्यास जैविक खताची प्रक्रिया केली जाऊ शकते. ५oo लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळावे व द्रावण तयार करावे. या द्रावणात पिकाचे बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.

जैविक खतांचे फायदे :-

१)जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
३)जैविक खतांमध्ये जमीन, पाणी व पिके यांसाठी अपायकारक अशी रसायने नसतात त्यामुळे उपयुक्त जीवजंतू व मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही.
सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते व जमिनीचा पोत सुधारतो व नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
४)पिकाच्या उत्पादनात १५ ते ३० टक्के वाढ होते.
जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रति जैविकांमुळे पिकाची रोग व कीड़ प्रतिकारशक्ती वाढते.
५)जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजीवकांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते व पिकाची वाढ चांगली होते.
६)जैविक खते तुलनेने स्वस्त असतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.
७)नत्र स्थिर करणारी जैविक खते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. प्रती हेक्टरी २५ ते ३oo किलोपर्यंत नत्र उपलब्ध केले जाते. रासायनिक खतांद्वारे एवढे नत्र उपलब्ध करण्यासाठी १ ते १२ गोष्णी युरिया वापरावा लागेल.
८)काही रासायनिक खते पुर्णत: पिकांना उपलब्ध होत नाहीत. जसे की, स्फुरदयुक्त रासायनिक खतांच्या उपलब्धतेचे प्रमाण १५ ते २० टक्के इतके आहे. उर्वरित ८५ ते ८० टक्के स्फुरद जैविक खतांच्या वापराने उपलब्ध होऊ शकते.
९)महाराष्ट्रातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याच्या प्रमुख कारणांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे एक आहे. झिंक विरघळविणारी जैविक खते जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळवून पिकांना उपलब्ध करतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी :-

१)जैविक खते शिफारस केलेल्या पिकांसाठीच वापरावीत. २)तसेच बाटलीवर दिलेल्या अंतिम दिनांकापूर्वी वापरावीत.
३)बुरशीनाशके, कीटकनाशके यांची बीजप्रक्रिया करावयाची असल्यास जैविक खत सावलीत, थंड जागी व थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
४)रायझोबियम जैविक खत पिकाचा गट पाहूनच खरेदी करावे व वापरावे.
५)कोडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व रासायनिक खते यांच्यासोबत ती मिसळू नयेत.
जिवाणू खते जिवंत राहण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा व सेंद्रिय पदार्थ असणे आवश्यक आहे.

कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांची द्रवरूप जैविक खते
जैविक खतांचे उत्पादन द्रवरुप स्वरूपात कृषि विभागाच्या जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत असून ही जैविक खते ही महा या ब्रेडनेमखाली तयार केली जात आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...