सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कपाशी वरील लाल्या ची लक्षणे आणि त्याचे नियंत्रण कशा पद्धतीने करावे🐝🐞🌾🌱


महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कपाशी हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते, परंतु कपाशीवर ही मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड आळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे इत्यादींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व आर्थिक उत्पन्नातही घट होते. त्यातल्या त्यात मागील बऱ्याच वर्षापासून कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लाल्या रोगामुळे कपाशीचे उत्पन्न जवळजवळ 20 ते 25 टक्क्यांनी घटते. या रोगाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लाल्या रोग प्रामुख्याने जमिनीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो किंवा त्याला अन्य कारणेही कारणीभूत आहेत.

• कपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे :- 

कपाशीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरिद्रव्य नष्ट होऊन अँथोसायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे कपाशीची पाने लाल पडल्यासारखी दिसतात. त्यांचा रंग लाल होतो व शेवटी प्रादुर्भाव झालेली पाने गळून पडतात तसेच कपाशीवरील पाते, फुले ही गळून पडतात.

लाल्या ची काही चित्र :-




 • कपाशीवर लाल्या रोग येण्याची कारणे :-

1- जर आपण जास्त अन्नद्रव्य लागत असलेल्या पिकांची लागवड केली असेल.  जसे ऊस, केळी यासारखे पिके शेतात घेतली व त्याच्यानंतर त्या जागेवर कपाशीची लागवड केली तर कपाशीला लागत असलेले अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात मिळत नाहीत. हे प्रमुख आणि महत्त्वाचे कारण आहे.

2- बरेच शेतकरी पीक फेरपालट करत नाहीत जसे की कपाशीच्या लागवड केलेल्या शेतात पुन्हा कपाशीची लागवड करणे.

3- अतिशय हलक्‍या जमिनीत किंवा मुरमाड जमिनीत कपाशीची लागवड केल्यास त्याचा प्रादुर्भाव होतो.

4- जमिनीत जर जास्त पाणी झाले होते साचून राहिले पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही किंवा पाण्याचा जास्त ताण पडला तर त्याचा परिणाम जमिनीतील नत्र, मॅग्नेशियम हो जास्त सारखे आवश्यक मूलद्रव्य झाडांना आवश्यक त्या प्रमाणात शोषता येऊ शकत नाही.  हे एक मोठे महत्त्वाचे कारण आहे.

5- साधारणत आपण पाहतो की कपाशीच्या बोंडे येण्याच्या अवस्था असते तेव्हा कपाशीच्या पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज असते. नेमके याच काळात जर नत्राचे प्रमाण कमी झाले तर कपाशीची पाने लाल होतात.

6- सध्याच्या बीटी जनुक असलेल्या कपाशीच्या जातींमध्ये बोंड आळीला अटकाव करण्यासाठी चा गुणधर्म असतो. त्यामुळे झाडावर जास्त बोंडे टिकून राहतात.  परिणामी जास्त बोंडाना जास्त प्रमाणात नत्राची गरज भासते व झाडास जमिनीतून आवश्यक त्या  नत्र न मिळाल्यास बोंडसाठी लागणाऱ्या नत्राची गरज पानातून भागवली जाते.  त्यामुळे पानांमधील नत्राचे प्रमाण कमी होऊन कपाशीचे पाने लाल पडू लागतात.

7- साधारणतः पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जास्त वेगाने वारे वाहत असल्यास पिकाचा कालावधी काही प्रमाणात कमी होतो त्यामुळे ही पाने लाल पडू शकतात.

8- कपाशीवर तुडतुडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पान सुरुवातीस कडेने लाल पडून नंतर संपूर्ण पाने लालसर दिसते.

9- तसेच फुलकिडे व लाल कोळ्याच्या प्रादुर्भावामुळे ही काही प्रमाणात पाणी लालसर दिसतात.

 

 लाल्या रोगावरील नियंत्रणाचे उपाय :-

  • कपाशी पिकासाठी जमिनीची निवड करताना हलक्‍या जमिनीत कपाशीचे पीक घेऊ नये कपाशीसाठी योग्य जमिनीची निवड करावी.
  • योग्य पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये कपाशी घेणे टाळावे. पाणी साचल्यास त्वरित चर काढून साचलेले पाणी शेताबाहेर काढून द्यावे.
  • शिफारस केल्याप्रमाणे खतांच्या योग्य मात्रा द्याव्यात कोरडवाहू साठी नत्राची मात्रा दोन वेळा द्यावी आणि बघायची साठी तीन वेळा विभागून देणे अतिशय आवश्‍यक असते.
  • कपाशीला बोंडे भरणे, पाते लागणे यासारख्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत दोन ते तीन वेळेस दोन टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी करावी.
  • जर कपाशीवर लाल्या रोगाची लक्षणे दिसू लागल्यास 40 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून शिफारसीनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात किंवा जमिनीतून 20 ते 30 किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे.
  • कपाशीवर मावा तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रभाव दिसत असेल तर त्यांच्या नियंत्रणासाठी 20 मिली फिप्रोनील, किंवा दहा मिली इमिडाक्लोप्रिड किंवा 20 मिली बुप्रोफेझिन(25 एस सी ) प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ही जास्त पाऊस झाला आहे. यावेळेस कपाशी पिकाची व्यवस्थित निगा ठेवणे फार गरजेचे असते. वरीलप्रमाणे उपाय जर केले किंवा काळजी घेतली तर कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...