दशपर्णी अर्क कसा बनवावा :-
या शब्दांमध्येच अर्थ आहे की दहा प्रकारच्या पानांचा अर्क होय.
कडुलिंबाचा पाला(छोटी पाने फांद्यांसह),करंजाची पाने (छोटी पाने फांद्यांसह),सिताफळ पाला,एरंडाची पाने,टणटणी,बेलाची पाने,पपईची पाने,रूईची पाने, निरगुडीची पाने,गुळवेलाची पाने प्रत्येकी 2 किलो.
वरील झाडांची पाने उपलब्ध न झाल्यास
तुळशिची पाने,पेरूची पाने,आंब्याची पाने,पळसाची पाने,कन्हेराची पाने,कारल्याची पाने,शेवग्याची पाने,मोहाची पाने,बाभुळाची पाने,आघाड्याची पाने,चिंचेची पाने या झाडांची पाने वापरू शकतो. इ.पाने करावीत.
अर्क बनविताना लागणारा झाडांचा पालायामध्ये कडूलिंब,करंजी,गुळवेल, सीताफळ या झाडांचा पाला समाविष्ट असणे अतीआवश्यक आहे.
दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो.
याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते:-
- कडुलिंबाची पाने - ५ किलो
- करंजाची पाने - २ किलो
- निर्गुडीची पाने - २ किलो
- टनटनीची पाने - २ किलो
- सिताफळाची पाने - ३ किलो
- रुईची पाने - २ किलो
- लाल कन्हेराची पाने - २ किलो
- पपईची पाने -२ किलो
- मोगली एरंडाची पाने - २ किलो
- गुळवेलीची पाने - २ किलो
- गायीचे शेण - २ किलो
- गोमुत्र - ५ लिटर
- पाणी - १७० लिटर
असा तयार केलेला १२५ मिलि अर्क हा १० लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.
या जैविक कीटकनाशकाच्या वापराने मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अळी यांच्यावर प्रभावी काम करते याची फवारणी शक्यतो दर आठ दिवसाला करावी.
दशपर्णी अर्क बनविताना शेतकरीदशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे :-
१) दशपर्णी अर्क फवारणी मुळे लहान अळ्या, रसशोषक कीड,कीडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
२) उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होता.
३) सर्व पिकावर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.जरी आवश्यकता भासल्यास त्याचे प्रमाण खुप कमी असेल.
४) रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर किटनाशकांचे अंश राहत नाहीत.
५) मित्रकिडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो.
६) पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो. व शेतीमालास सेंद्रिय म्हणून उत्तम दरही मिळू शकतो.
Note :- दशपर्णी अर्क तयार करण्याच्या या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या पद्धती आहेत. आणि निश्चितच त्याचा सुद्धा आपल्या शेतीला फायदाच होणार आहे. शेवटी पद्धत कोणतीही असली तरी शेतकरी राजाला त्याची मदत व्हावी एवढीच आशा.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें