चिकट सापळे महत्व
पिवळा चिकट सापळा: हे बहुतेक भाजीपाला पिकांमध्ये वापरले जाते. याच्या वापराने पांढरी माशी, ऍफिड, लीफ मायनर इ. आणि मोहरी पिकावर हल्ला करणार्या ऍफिड्सवर प्रभावी नियंत्रण मिळू शकते.
निळा चिकट सापळा: भातासह अनेक फुले व भाजीपाला पिकात थ्रीप्स शोषक कीटक नियंत्रित करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरतात.
पांढरे चिकट सापळे: पांढरे चिकट सापळे फळे आणि भाजीपाल्यातील लाल बीटल कीटक आणि बग कीटक नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात.
ब्लॅक स्टिकी ट्रॅप : टोमॅटोवरील किडीच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. याचा वापर हा प्रामुख्याने टोमॅटो पिकातच केला जातो.
सापळे शेतात वापराचे फायदे माहिती करून घ्या.
१. रस शोषणाऱ्या किडी आणि त्यांच्यापासून प्रसारित होणाऱ्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी.
२. टोमॅटो, मिरची, वांगी सर्व शोषणाऱ्या किडी आणि त्यापासून प्रसारित होणा-या रोगापासून संरक्षण कोबी, फ्लॉवर रस शोषणाऱ्या किडी आणि पतंगवर्गीय किडींपासून संरक्षण काकडी, कारले (वेलवर्गीय पिके) - रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण.
३. आंबा, पेरू, केळी (फळवर्गीय पिके) रस शोषणान्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण • कांदा, बटाटा, लसूण (कंद वर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण.
सापळे चा वापर शेतात कसा करावा आणि का करावा ??
१. चिकट सापळे चे पाकीट कापावे.
२. चिकट भागाला हात लावण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावे.
३. सापळे एकमेकांपासून वेगळे करावेत.
४. भाजीपाला पिकांमध्ये रोपाच्या उंचीच्या दुप्पट उंचीची काठी घेऊन त्याला सापळा लावावा. सापळयाची उंची हि पिकाच्या उंची पेक्षा १ फुट उंच ठेवावी.
५. फळपिकांमध्ये सापळे हे झाडाच्या मध्यभागी लावावेत.
६. सापळे शक्यतो पूर्व-पश्चिम जास्त उजेड पडून चमकतील असे लावावेत.
सापळे का वापरावे आणि फायदा काय होतो..
१. निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.
२. पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.
३. पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.
४. किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.
कीटक नियंत्रणसाठी जास्त फायदा मिळाला पाहिजे या साठी हे नक्की करा.
१. सापळे पिकाच्या लागवडीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात लावावेत.
२. चांगल्या परिणामासाठीफ एकरी २० ते ३० सापळे वापरावेत.
३. सापळे ९० टक्के किटकांनी किंवा धुळीने भरल्यास त्वरित बदलावेत.
👍🏻👍🏻🙏🏼👍🏻🍀☘️🍃🌱🌿🌾🌱
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें