टोमॅटो पिकातील काही महत्वपूर्ण टिप्स

1. झिमझिम पाऊसात बॅकटिरियाल करपा ह्या रोगा पासून सौंरक्षण करण्यासाठी कॉपर + वॅलीडामासीन, रोको +फोस्कॉन, ची फवारणी खूप महत्वाची आहे.
2. पीथीयम बुरशी मुळे गळ पडत असल्यास ट्रायसिडर्मा व सुडोमोनास ची आळवणी किंवा ड्रीप ने सोडावे.
3. बॅकटिरियाल मर दिसत असल्यास सुडोमोनास व बॅसिलस द्यावे.
4. बांधणी च्या आधी पर्यंत कमीतकमी 12 ते 15 किलो कॅल्शियम दिलेला खूप चांगला राहील.
5. प्लॉट बांधणी च्या वेळे पर्यंत पाऊस असल्यास झाडाची ज्यास्त वाढ होते तेंव्हा टिल्ट एकरी 40 मिली देऊ शकता.
6. बांधणी च्या वेळेस मोलिबडीनम एकरी 100 ग्राम + अमायनो ऍसिड + 250 ग्राम मायक्रो न्यूट्रियएन्ट झाडाची वाढ व्यवस्थित होऊन चांगली फुल व फळ धारणा होते.
7. फॉस्फोरस जमिनीत खूप लवकर फिक्स होते त्यामुळे त्याला टप्याटप्याने थोडा थोडा द्यावे.
8. तिरंग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फुलधारणे पासून Fe (फेरस) ची फवारणी व ड्रीप द्वारे द्यावे (एकरी 100 ग्राम).
9. मँग्नीशियाम चा वापर सुरवाती पासुनच करावे त्यामुळे बुडातील पाने पिवळे होण्याचा (हळद्या) प्रमाण कमी होते। त्या सोबत ह्युमिक ऍसिड व फलविक असिड पण वापरावे.
10. तिरंगा टाळण्यासाठी लागवडीच्या सुरुवाती पासून Ca, Mg, Fe आणि बोरान दर 10 ते 12 दिवसात दिल्यास पुढील तिरंग्याचा संकट टाळू शकतो किंवा प्रमाण कमी करू शकतो.
11. प्लॉट बांधणी झाल्या नंतर लगेच चिकट सापळे व कामगंध सापळे लावा.
12. चुनखडी युक्त जमिनी मध्ये इकोजंट व सल्फर चा वापर ज्यास्त.
13. फुलधारणा कमी वाटत आल्यास बोरान + ऍग्रोपॉवर ची फवारणी घ्यावी। डबल च्या वापरामुळे गर्भ धारणा व्यवस्थित होऊन उत्पन्न वाढी मध्ये मदत होते.
14. फुलगळ ज्यास्त होत असल्यास ड्रीप मधून 12:61:00 सोडावे समाधानकारक रिजल्ट्स मिळत आहेत.
15. फुगवणीच्या कालावधी मध्ये K पोटॅश ड्रीप वाटे द्या.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें