मावा कीड :-
Aphids
हि कीड आंबा, आले, उडीद आणि मूग, ऊस या पिकांमध्ये देखील दिसून येते.
हि लक्षणे आपल्या पिकावर दिसताहेत का ते तपासा आणि नियंत्रणात्मक उपाय करावे.
• पाने मुडपलेली आणि विकृत होतात.
• पानांखाली आणि कोंबांखाली छोटे-छोटे किडे असतात.
• वाढ खुंटते.
• किडीचा जीवन क्रम व प्रसार :- हा कीटक चिकट व गोडसर पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकतो. हा द्रवपदार्थ खाण्यास मुंग्या त्या बाधित रोपावर जमा होतात. त्यांचे पाठीवर बसून माव्याची पिल्ले दुसऱ्या रोपट्यावर स्थलांतर करतात व त्यास बाधित करतात.
मावा आकाराने लहान व मऊ शरीराचे किडे असून त्यांचे पाय आणि अॅन्टेना लांब असतात. त्यांची लांबी ०.५ मि.मी. ते २ ते २ मि.मी. असून शरीराचा रंग प्रजातीप्रमाणे पिवळा, तपकिरी, लाल किंवा काळा असु शकतो. मावा बरेच प्रकारचे असतात. त्यात पंखहीन असलेला मावा, पंखवाले, मेणकट किंवा लोकरी प्रकारापेक्षा जास्त आढळतात. ते बहुधा पानाच्या खालच्या बाजुला आणि शेंड्यावर एका गटाने बसून आपली सोंड झाडाच्या मऊ पेशींमध्ये टोचून रससोषण करतात. कमी ते मध्यम संख्येने असल्यास झाडाला जास्त नुकसानदायक नाहीत. वसंत ऋतुच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्राथमिक उपद्रवानंतर त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नैसर्गिक शत्रुंमुळे बऱ्याचशा कमी होते.
मावा मादीचे प्रजनन संयोगाविना होते. मादी सरासरीने १५ पिलांना जन्म देते. याची वाढ साधारणतः १ आठवड्यात पूर्ण होते. याच्या जगण्याची दर मर्यादा २ ते ३ हप्ते आहे.
पिकांवर होणारे नुकसान :-
• हा कोवळ्या वनस्पतींवर जगणारा कीटक असल्यामुळे,वाढलेल्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे तो नुकसान अधिक करतो.
• हि कीड पानाचे खालच्या बाजूस राहून त्याचा रसाचे शोषण करतो.
• त्यामुळे पिकांची पाने दुमडतात.
• वनस्पती करपतात.
• त्यांची वाढ नीट होत नाही.
• पानांवार चिकट द्रव सोडतो.
मावा किडीवर काही नियंत्रणात्मक उपाय योजना :-
• शेताच्या आजुबाजुला विविध प्रकारची झाडे मो-ठ्या प्रमाणात लावा.
• आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
• प्रकाश परावर्तीत करणाऱ्या आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करावा ज्यामुळे माव्याच्या प्रदुर्भावास आळा बसेल.
• रोगाच्या किंवा उपद्रवाच्या घटनांच्या गंभीरतेचे मूल्यांकन करण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
• झाडावरील प्रादुर्भाव झालेले भाग काढून टाका.
• शेतातुन आणि आजुबाजुने तण तपासा.
• प्रमाणापेक्षा जास्त खत व पाणी देणे टाळा.
• मुंग्या नेहेमी माव्याचे संरक्षण करत असतात त्यामुळे चिकट सापळे लाऊन मुंग्यांचे नियंत्रण करा.
• झाडीत हवा खेळती रहाण्यासाठी फांद्या छाटा किंवा . खालील पाने काढुन टाका.
• शक्य असल्यास झाडांच्या संरक्षणासाठी जाळी (इनसेक्ट नेट) लावा.
• मित्रकिड्यांवर परिणाम होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर संयमित ठेवा.
मावा किडीची आर्थिक नुकसान पातळी :-
Aphids economic threshold level (ETL) :-
कपाशी पिकांमध्ये १५ते २० प्रादुर्भाव ग्रस्त झाडे दिसत असल्यास आपण नियंत्रनात्मक उपाय करावे
मावा कीडिच्या नियंत्रणा साठी जैविक उपाय :-
जर प्रादुर्भाव कमी असेल तर साध्या कीटकनाशक साबणाचा द्राव किंवा झाडांच्या तेलावर आधारीत द्राव वापरा, उदा. नीम तेल (३मि.ली./ली). दमट हवामानात मावाही बुरशीजन्य रोगास संवेदनशील असतात. अशा वेडी त्यांना पळविण्यासाठी प्रभावित झाडांवर साध्या पाण्याची फवारणी देखील उत्तम ठरते. निमअर्क अर्क आणि दशपर्णी अर्काचा वापर करणे
रासायनिक नियंत्रण करायचे असल्यास :-
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा.
Dinotefuran (डायनोटफ्युरॉन) 20.0 SG
व्यापारी नावे :-
• Dinocron (Coromandel International Limited)
• Ossum (Biostadt)
• Dainacorn (Coromandel International Limited)
Thiamethoxam (थियामेथॉक्झॅम) 25.0 WG
व्यापारी नावे :-
• Actara (Syngenta)
• Torpid (Godrej) .
• Thioguard (Advance)
Flonicamid (फ्लोनिकॅमिड) 50.0WG
व्यापारी नावे :-
• Flonicamid 50.0% WG (Swal)
• Panama (Swal)
• Ulala (UPL)
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें