- कपाशीवरील जीवणूजंण्य करपा :-
Xanthomonas citri subsp. malvacearum
- प्रादुर्भावाची लक्षणे :- असल्यास ओळख करण्यासाठी खालील लक्षणे असल्यास निरीक्षण करावे.
• पानावर, बोंडांवर आणि फांद्यांवर कोणेदार ते गोलाकार, लाल ते तपकिरी कडा असलेले मेणचट, पाणी शोषल्यासारखे ठिपके येतात.
• कालांतराने ते डाग तपकिरी होतात.
• फांद्यांवर आणि खोडावर काळे व्रण येतात.
• त्यामुळे अकाली पानगळ होते.
• प्रादुर्भाव देठ, पाने, फुलाच्या देठाशी असणारी कोवळी पाने आणि बोंडांवर दिसतो. पानांवर ठिपके दिसतात, देठे व पानांच्या शिरा करपतात, बोंडे सडतात. पर्णदलावर लहान, हिरवे, पाणी शोषणारे गोलाकार किंवा अनियमित ठिपके विकसित होऊन तांबूस रंगाचे होतात. अधिक तीव्रतेचा प्रादुर्भाव असल्यास पर्णदल आणि रोपांत विकृती निर्माण होते. काळे आणि वाढलेले डाग पर्णदलामध्ये पसरून रोप मरते. पानाच्या मागील भागावर गडद रंगाचे अर्धपारदर्शक डाग दिसून येतात. नंतरच्या टप्प्यात पानांवरील डाग कोनात्मक होऊन, तांबूस ते काळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे चट्टे दिसतात. काही वाणांमध्ये जिवाणू पानांच्या शिरा आणि आजूबाजूच्या पेशीसमूहांमधे प्रवेश करून त्या नष्ट करतात. पीक पिवळे पडते, विकृती निर्माण होऊन पानगळ होते. लहान देठांवर लांब आणि काळपट चट्टे पडतात. लहान बोंडावर कोनात्मक ते अनियमित काळे दबलेल्या आकाराचे ठिपके दिसतात. उष्ण व दमट हवामानात जिवाणू प्रादुर्भावामुळे बोंडे सडतात, बोंडाची गळती होते, विकृती निर्माण होते.
- हा रोग कशामुळे होतो त्याची सर्विस्तर माहिती दिली आहे :-
• झँथोमोनाज सिट्रिच्या उपप्रजाती मालवेसेरममुळे कपाशी वर जीवणूजंण्य करपा उद्भवतो. हे जीवाणू संक्रमित झाडांच्या अवशेषात आणि बियाणात जगतात. हा कपाशीवरील सर्वात जास्त नुकसान करणारा रोग आहे. जोरदार पाऊस आणि उच्च आर्द्रता याबरोबर ऊबदार तापमान, रोगाच्या वाढीस अनुकूल असते. जीवाणू पानांच्या नैसर्गिक छिद्रातुन किंवा शेतात काम करताना झालेल्या जखमांतुन पानात शिरतात. जोरदार वादळी पाऊस किंवा गारपीट झाली असता रोग सर्वात जास्त गंभीर का असतो ते यावरुन कळते. संक्रमण बियाणांद्वारे असल्याने, दूषित बियाणांना आम्ल उपचार करुन जीवाणूंचा प्रसार कमी केला जाऊ शकतो. स्वयंभु झाडाचे रोप देखील जीवणूजंण्य करप्याच्या संक्रमणाचे प्राथमिक स्त्रोत असु शकतात.
• ढगाळ वातावरणात कपाशीवर जिवाणूजन्य पानांवरील चट्टे आणि ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. प्रामुख्याने हा रोग बीटी आणि संकरित जातींवर फुलोरा आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
• रोगकारक जिवाणू - झान्थोमोनास ऑक्सोनोपोडीस पीवी. मालव्यासियारम अनुकूल घटक ३२ ते ३७ अंश सेल्सिअस तापमान, सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के. लवकर केलेली पेरणी, उशिरा झालेली विरळणी आणि सिंचन. जमिनीची सदोष मशागत, जमिनीत पालाशची कमतरता. पावसाळी, ढगाळ हवामानानंतर लख्ख सूर्यप्रकाश.रोगाचे चक्र रोगकारक जिवाणू बियाण्याच्या आत, बियाण्यावर, कपाशीच्या धाग्यांवर आणि न कुजलेल्या पिकांच्या काडीकचऱ्यावर सुप्तावस्थेत राहतात. प्राथमिक स्रोत हा प्रादुर्भावीत बियाणे आणि त्यावरील धागे असतात. दुय्यम प्रसार हा वादळी पाऊस व दवबिंदूद्वारे होतो.
- हा रोग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी किंवा प्रतिबंधक उपाय :-
• उच्च प्रतीचे, रोगमुक्त किंवा आम्ल उपचार करुन रुई काढलेले बियाणे लावा.
• करपा प्रतिकारक वाण लावणेही रोग टाळण्याची प्रभावी पद्धत आहे.
• शेताचे निरीक्षण करून संक्रमित आणि आजुबाजुचीही काही झाडे काढुन टाका.
• झाडीत आर्द्रता कमी रहाण्यासाठी आणि पाने कोरडी
ठेवण्यासाठी शक्य होईल तितकी झाडी मोकळी ठेवा.
• झाडी ओली असताना, शेतात काम करणे टाळा किंवा लागवड करु नका.
• फवारा किंवा तुषार सिंचन करु नका.
•अधिक नुकसान टाळण्यासाठी संक्रमित पिकाची काढणी शक्य तितक्या लवकर करा.
• रोपे शक्य तितक्या लवकर काढुन जाळा.
• संक्रमित झाडांचे अवशेष विघटित होण्यासाठी खोल पुरा.
• संवेदनशील नसणाऱ्या पिकाबरोबर फेरपालट करा.
- जैविक नियंत्रण :-
सुडोमोनस फ्ल्युरोसेनस आणि बॅसिलस सबटिलिस जुंत असणाऱ्या टाल्क आधारीत पावडरीच्या द्रावणांचा वापर एक्स. माल्व्हॅसिरमविरुद्ध चांगले परिणाम देतो. आझादी्रॅक्टिन इन्डिका (नीम अर्क) चा अर्क वापरा. वाढ नियंत्रक उत्पाद जे अनियंत्रित वाढ थांबवतात ते वापरुन सुद्धा जिवाणूजन्य करण्याचे संक्रमण टाळले जाऊ शकते.
- रासायनिक नियंत्रण :-
नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अधिकृत प्रतिजैवकांसोबत कॉपर ऑक्झिक्लोराइडचे बीजोपचार केल्याने देखील कपाशीवर जिवाणूजन्य करपा देणाऱ्या जंतुंविरुद्ध चांगला प्रभाव मिळतो.
(प्रतिलिटर पाणी) कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम आधिक स्ट्रेप्टोमायसीन* १०० मिलीग्रॅम रोगाचे प्रमाण पुन्हा आढळल्यास पहिल्या फवारणीनंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें