सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ट्रायकोग्रामा मित्र किडीची संपूर्ण माहिती 🌱🐞🐝

हा एक अळीवर्गीय किडींच्या अंड्यांवर उपजिविका करणारा महत्त्वाचा मित्रकीटक आहे. जैविक कीड नियंत्रणामुळे या कीटकाचा सर्वांत प्रथम वापर १९२५ सालापासून सुरु झाला. हानिकारक किडीच्या बंदोबस्तासाठी हा किटक जगातील बहुतेक देशात सरस ठरला आहे. हा किटक शेतीस उपद्रव करणा-या अळीवर्गीय कीटकांच्या अंड्यांचा नाश करतो. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान प्राथमिक अवस्थेतच टाळणे शक्य होते, म्हणूनच या किटकाला जैविक किड नियंत्रणामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.

ट्रायकोग्रामाच्या भारतामध्ये एकूण २६ जाती आढळतात. त्याचप्रमाणे काही जाती भारताबाहेरुन आणून त्याही भारतामध्ये यशस्वीरित्या पीक संरक्षणामध्ये भूमिका निभावून आहेत. त्यापैकी ट्रा. चिलानीस, ट्रा. जापोनिकम, ट्रा. अकाई व ट्रा. नागरकट्टीया महत्त्वाच्या आहेत. त्यांचा उपयोग विविध पिकांवरील पंतगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम :-

टायकोग्रामा हा सुक्ष्म कीटक असून अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमध्ये त्याचा जीवनक्रम पुर्ण होतो. अंडी अवस्था १६ ते २४ तास व अळी अवस्था २-३ दिवसांत पुर्ण होते. कोष पुर्ण होण्यास ४-५ दिवस लागतात. अंडी, अळी आणि कोष या तिन्ही अवस्था यजमान किडींच्या अंडयातच पुर्ण होतात आणि त्यातून पुर्ण वाढ झालेले ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. प्रौढ ट्रायकोग्रामाची लांबी ०.४० ते ०.७० मि.मी. असते. एका टाचणीच्या टोकावर ८-१० प्रौढ शकतील इतके हे कीटक सुक्ष्म असतात. मादी किडीच्या अंडयामध्ये १ ते २० अंडी घालते. एक मादी प्रजातीप्रमाणे २० ते २०० अंडी घालु शकते. ट्रायकोग्रामाचा प्रौढ २४ ते ४८ तास जगतो. ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांचा तर हिवाळयात ९ ते १२ दिवसांचा असतो.

ट्रायकोग्रामा शेतात सोडण्याची पद्धत :-

ट्रायकोकार्डस् शेतात वापरणे अतिशय सोपे आहे. प्रयोगशाळेतून कार्ड्स दिल्या नंतर २४ तासाच्या आत शेतात वापरण गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे एकाचवेळी २ सीसी (म्हणजेच २ कार्डस् ४०००० ट्रायकोग्रामा कीटक) प्रती एकरी पुरे आहेत. एका कार्डच्या आखल्याप्रमाणे कात्रीने पट्ट्या कराव्यात त्या पट्ट्या झाडाच्या पानाखाली ऊन पडणार नाही या रीतीने व ट्रायकोग्रामा जमिनीकडे राहील अशा पद्धतीने स्टेपल कराव्यात. एक एकरात समसमान विखुरल्या जातील या पद्धतीने टाचाव्यात. हीच क्रिया १० ते १५ दिवसाच्या अंतराने पुन्हा करावी. असे एकूण चार ते सहा वेळा पिकावर सोडावे. काही तासातच किंवा दुसऱ्या दिवशी प्रौढ ट्रायकोग्रामा बाहेर निघून हानीकारक किडींच्या अंड्याचा शोध घेतात आणि त्यात स्वतःची अंडी घालतात अशा रीतीने किडींचा नाश होतो. कार्डवर दाखवीलेल्या अंतिम तारखेच्या आतच त्याचा वापर करावा. जर त्याआधीच ट्रायकोग्रामा निघाला असेल तर त्वरित शेतात पोहोचावे पट्ट्या कापाव्यात आणि टाचाव्यात. पिशवी उलटी करून हळुवारपणे पिकावर झटकावी. उसावरची खोडकिड, कांडीकीड, कपाशी वरची गुलाबी बोंड अळी, भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणाऱ्या अळ्या, मक्यावरील लष्करी अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी, भातावरील खोडकिडी इत्यादी किडींना ट्रायकोग्रामा चांगल्या प्रकारे फस्त करतो. ट्रायकोग्रामा कार्डस् स्वतः जावून आणावेत. पोष्टाने कार्डस् पाठवता येत नाही आणि वेळेत शेतात लावलेत. वेळ केला तर अंडयातून प्रौढ ट्रायकोग्रामा निघून तो मरण्याची शक्यता असते. शेतात ट्रायकोग्रामा सोडल्यानंतर हानिकारक औषधांची फवारणी करू नये. सकाळी अथवा सायंकाळी ट्रायकोग्रामा शेतात सोडावे. पिकास पाणी दिल्यानंतर ट्रायकोग्रामा सोडणे जास्त फायद्याचं ठरते. ट्रायकोग्रामा डीप फ्रीज मध्ये ठेवू नयेत. अंतिम तारखेपर्यंत वापर करणे शक्य नसल्यास ट्रायकोग्रामा रेफ्रिजरेटरमध्ये साठवून 15 ते 21 दिवस पर्यंत वापरता येतात. 

ट्रायकोग्रामा वापरण्याचे प्रमाण :-

भुईमूग, कापूस, तूर, भात, सूर्यफुल, ऊस, वांगी, ज्वारी,    मका या पिकावरील येणारे पतंगवर्गीय किडींचा नाश करतात. इत्यादी पिकांवर एकरी २-३ कार्डस दर १०-१५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे. पीक ४०-५० दिवसाचे झाल्यावर पहिल्यांदा कार्ड लावावे. -टोमॅटो, भेंडी, वांगे अशा भाजीपाला पिकामध्ये दहा दिवसांनी एकरी २ कार्ड लावावे.
उसावरील सर्व प्रकारच्या खोडकिड्यावर ट्रायकोग्रामा चिलोनिस एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांनी ८-१० वेळा लावावे. हे कार्ड उसाला ४५ दिवसांपासून वापरावे. ट्रायकोग्रामा खोडकिड्याचा नायनाट करतो.
कापूस पिकावरील तिन्ही बोंड अळ्यांसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस आणि ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री वापरावे. पेरणीपासून ४०-४५ दिवसांपासून ट्रायकोकार्ड लावायला सुरवात करावी. एकरी २-३ कार्ड दर १० दिवसांच्या अंतराने ४-५ वेळा लावावे. गुलाबी बोंड अळीचा अंडावस्थेमध्येच नाश करता येतो.
      
             मका, ज्वारी पिकावर एकरी १-२ कार्डस दर दहा दिवसांच्या अंतराने पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी लावावे.
भातावरील खोडकिड्यासाठी ट्रायकोग्रामा जापोनिकमचे १-२ कार्डस सहा आठवडे लागोपाठ लावावे. परत रोवणी केल्यानंतर ३० दिवसांपासून कार्ड लावायला चालू करावे.
ट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा. 


ट्रायकोग्रामा वापरण्याचे फायदे :-


* ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक वापरण्याचे फायदे अनेक आहेत.

  १) ट्रायकोग्रामा किडींच्या अंड्यावर उपजीविका करतो. त्यामुळे किडींचा अंडी अवस्थेतच नाश होतो.

  २) ट्रायकोग्रामा स्वतःच अशा किडींच्या अंड्याचा शोध घेऊन त्याचा नाश करतो.
 
  ३) ३-४ वर्षे सातत्याने ट्रायकोग्रामा सोडल्यास त्या क्षेत्रात     त्याची नैसर्गिक रित्या  प्रचंड  संख्या वाढते. त्यामुळे किडी नष्ट होतात.

  ४) ट्रायकोग्रामा वापरल्याने कीटकनाशकावर होणारा खर्च कमी होतो.

  ५) शेतात सोडण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि सहज शक्य आहे.

  ६) प्रदूषण विरहीत पर्यावरण साध्य होते.

  ७) ट्रायकोग्रामाचा इतर मित्र किटकांवर विपरीत परिणाम होत नाही.

  ८) ट्रायकोग्रामा मानवाला आणि पाळीव प्राण्यांना अपायकारक नाही.

  ९) अशा या मित्र किडींची मदत शत्रू किड्यांचा नामशेष करण्यासाठी घेतलीच पाहिजे.

*पीकनिहाय वापरावयाच्या ट्रायकोग्रामा प्रजाती बाबत माहिती :- 

१) ट्रायकोग्रामा चीलोणीस :- भाजीपाला / उस /   (जवळपास सर्व पिकांवर उपयुक्त)

२) ट्रायकोग्रामा बॅक्ट्री :- कापूस (गुलाबी बोंड अळी)

3) ट्रायकोग्रामा जॅपोनिकम :- भात (खोडकिडा)

४) ट्रायकोग्रामा प्रीटीओझम :- मका (अमेरिकन लष्करी अळी) / टमाटर




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍

🍊 सातपुड़ा का सूखा संतरा पहुँचा रहा है विदेश तक | किसानों के लिए सुनहरा अवसर 🌍 स्थान: महाराष्ट्र के अकोला जिले में स्थित सोनाळा गांव , जो सातपुड़ा की गोद में बसा है, वर्षों से संतरे की बेहतरीन गुणवत्ता के लिए प्रसिद्ध है। यहां करीब 2000 से 3000 एकड़ में संतरे की खेती होती है। 🧪 सूखे संतरे के औषधीय व औद्योगिक उपयोग ✅ हर्बल उत्पाद: डिटॉक्स चाय, काढ़ा, सिरप ✅ कॉस्मेटिक उद्योग: फेस स्क्रब, साबुन, फेस पैक ✅ औषधीय क्षेत्र: इम्युनिटी बूस्टर, एंटीऑक्सिडेंट सप्लिमेंट ✅ फूड इंडस्ट्री: कुकीज, केक, फ्लेवरिंग एजेंट ✅ अरोमा थैरेपी: परफ्यूम, पॉट पाउरी 📈 सूखे संतरे की निर्यात प्रक्रिया चयन: ताजे, परिपक्व और बिना खराबी वाले संतरे चुनें काटना: संतरे को 2-3 मिमी मोटे स्लाइस में काटें सूखाना: 50–60°C तापमान पर 10–12 घंटे सोलर/इलेक्ट्रिक ड्रायर में सुखाएं पैकेजिंग: एअरटाइट और मॉइस्चर-प्रूफ पाउच में पैक करें सर्टिफिकेशन: FSSAI, APEDA, IEC आदि प्राप्त करें 👨‍🌾 किसानों के लिए ...

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की बड़ी घोषणा, जानें पूरी जानकारी

महाराष्ट्र में नई फसल बीमा योजना: कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की घोषणा महाराष्ट्र सरकार ने किसानों को राहत देने के लिए एक नई फसल बीमा योजना शुरू करने की योजना बनाई है। कृषि मंत्री माणिकराव कोकाटे ने विधानसभा में इसकी घोषणा की और बताया कि यह योजना किसानों के लिए अधिक पारदर्शी और प्रभावी होगी। नई फसल बीमा योजना की मुख्य विशेषताएं 1. किसानों के लिए अधिक पारदर्शिता •  पहले की योजनाओं में किसानों को बीमा कंपनियों से मुआवजा मिलने में देरी होती थी। •  नई योजना में ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टम लाया जाएगा, जिससे किसानों को अपने दावों की स्थिति की रियल-टाइम जानकारी मिलेगी। •  सरकारी पोर्टल और मोबाइल ऐप के माध्यम से आवेदन और दावा प्रक्रिया को ट्रैक किया जा सकेगा। 2. प्रीमियम दरों में संशोधन •  पिछली योजना में 1 रुपये में फसल बीमा दिया गया था, लेकिन इसका दुरुपयोग होने की संभावना थी। •  नई योजना में संतुलित प्रीमियम प्रणाली लागू की जाएगी, जिससे असली किसानों को ही लाभ मिलेगा और कोई बिचौलिया फायदा नहीं उठा पाएगा। 3. दावे के निपटारे में तेजी •  पहले की योजनाओं में क...

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन!

🌾 बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण मागे - शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारचं आश्वासन! ✍️ By Advance Farming Techniques 🌱🐛🐞 📅 तारीख: 14 जून 2025 📍 ठिकाण:  गुरुकुंज मोझरी, अमरावती. 🔍 आंदोलनाची पार्श्वभूमी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी 8 जून 2025 पासून राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे. 🧑‍🌾 आंदोलनामागील प्रमुख मागण्या: शेतकरी कर्जमाफी: 2020 नंतरचं कर्ज देखील माफ करण्यात यावं. वीजबिल माफी: शेती वीजेच्या थकबाकीवर दंडमुक्ती व हफ्त्यांमध्ये भरणा. सिंचन यंत्रणा: मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करणे. शेतमाल हमीभाव: हमीभावात पारदर्शकता आणि थेट विक्रीची संधी. सरकारी योजनांची अंमलबजावणी: पीएम किसान, महाडीबीटी, ऋतू सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा. 🤝 राज्य सरकारकडून प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 14 जून रोजी उपोषणस्...